Young Reader's PAEAN


( *These are the writings by our students which are just their expressions without Grammatical corrections... ) 
😅😶 being quarantined    
(एका तरुण विध्यार्थ्यांच्या नजरेतून)🙏🙏🙏
Ms. Tanaya Rawal
12th Science.
मागच्या आठवड्या पर्यंत धकाधकीचं असलेलं आपल्या सगळ्यांचंच आयुष्य थांबून गेलय ...... शाळा, कॉलेज, ट्युशन सगळीकडून मिळालेली सुट्टी सुरवातीला हवीहवीशी वाटली... !!!!! त्यात वर परीक्षा सुद्धा पुढे ढकलल्या .... आमचं तर अगदी आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असं झालं ...... 

मग सुरु झाले काही वेगळे दिवस.... !!!! शाळेतून शेवटच्या दिवशी निघताना #कोरोनाच्या सुट्ट्या ह्या swag मध्ये निघालेलो आम्ही सगळ्यात पहिले ह्या सुट्ट्यांना कांटाळलो .....नव्याची नऊ दिवसांची नवलाई नऊ प्रहर सुद्धा टिकली नाही ..... आधी कस,  शाळा/कॉलेज आणि मग ट्युशन .... सकाळी ७ पासून ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत...  दिवस कसा फुल्ल पॅक असायचा ..... फ्रेंड्स आणि टीचर्स ला भेटणे .... कॅन्टीन च खाणे... ग्राउंड वर time pass करणे ..... ट्युशन नंतर chill करत हिंडणे ह्या सगळ्याची जणू सवयच झाली होती ....
routine च बनून गेलं होत .  आता काय दिवसाला काही बंधनच राहिले नाही.  कधीही उठा, करू वाटलं तर अभ्यास करा, मित्रांनाही ऑनलाइनच भेटा, घरातलेच खावा, कारण एकच : #CORONA . 
सगळी कडचे मॉल्स, कॅफे, थिएटर्स, हॉटेल्स, स्विमिन्ग पूल्स बंद .....लोक खुशाल म्हणतात "नेटफ्लिक्स अँड chill...." आहो ते सुद्धा बोरिंग झालाय आता...  घरी बसून अगदी बेरोजगार असल्याचा फील आलाय. नेहमी तर सुट्ट्यांची  वाट बघणारे आम्ही,आयत्या मिळालेल्या सुट्ट्यांना कंटाळलोय.आणि हो, ती डायलर tune .... आधी त्याच बाईची टेस्ट करा रे कोणीतरी....!!  तरी त्यातल्या त्यात एक बरं कोरोनाने wi-fi आणि नेट सर्विस वर काही परिणाम नाही. आमचे नेटिझन्स आमच्या साठी मिम्स, dubs, गाणी आणि ट्रोल्स बनवतात ... त्यांनी मात्र कोरोनाला पळवून लावायचा चंगच बांधलाय जणू ... corona जाईल कि नाही माहीत नाही पण ह्या मिम्स मुळे आमचा थोडा boredom कमी होतोय . आधी दिवस कसा जायचा हे पण कळत न्हवत पण आता हाथ धुण्याचे २० सेकंड्स सुद्धा लवकर सम्पत नाहीत. This is how you get affected without getting affected .....!!!😅😶   


टीव्ही, इंस्टाग्राम, फेसबूक , टिकटॉक,व्हाट्सएप्प, youtube जे उघडाल त्यावर पण कोरोनाच. ह्या सगळ्या सोसिअल साईट्स वर काय तर दुनियेतील कोरोना ग्रस्तांची संख्या, तसेच मृतांची संख्या, कुठे कुठे काय काय बंद, कोण कोण quarantine, कोण पळून गेलेय, आरोग्यमंत्रांच्या, मुख्यमंत्रांच्या आणि पंतप्रधानांच्या मुलाखती,

सॅनिटाझर्स आणि मास्क्स चा पडणारा तुटवडा आणि त्यांची बनावट विक्री करणारे लोक, सेफ्टी आणि precautionary messages, आणि तत्सम फॉरवर्ड्स .....असं झालाय कि हे नक्की माझं अकाउंट आहे का abp माझाच ??!!!!
किती ती नेगेटिव्हिटी???? सगळीकडे मृत्यू आणि रोगराईच वातावरण ....अफवांनी तर कहरच केलाय... मनाला येईल ते फॉरवर्ड करतात हे लोक.  व्हाट्सअँप  युनिव्हर्सिटी ने तर कमालच केलीये... कोरोनालाही माहित नसलेला त्याचा इतिहास आणि भविष्यवाणी सुद्धा ह्या युनिव्हर्सिटी वर viral होतीय.  
काही स्वार्थी आणि अर्ध शास्त्रद्यांनी बनावट सानिटीझर्स बनवून ह्या नेगेटिव्हिटी मध्ये भर घातलीय.
कशी वेळ आलीये ना ह्या मनुष्य जातीवर... आपल्यांना भेटता येत नाही, हाथ मिळवता येत नाही. इतके दिवस ज्या मानवाला आपल्या हुशारीवर गर्व होता त्याच मानवाला आज अस्तित्वासाठी  लढावं लागतंय...🙁😑 
४०० मिक्रोमिटर चा  जीव तो ६ अब्ज लोकसंख्या असलेल्या पृथ्वीला नाकी नऊ आणलेत ... गेले चार-पाच महिने पूर्ण जगभरातील नामवंत शास्त्रद्यांना ह्याची प्रतिरोधक लस शोधता आलेली नाही... हा आजार एक शिकवण आहे ... संपूर्ण जगासाठी... मानवासाठी.. आपल्या हुशारीवर नका इतका माज करू .. माणुसकी जपा ... 🙏🙌🤞
शेवटी मात्र तोच संदेश .... काळजी घ्या.... घाबरू नका पण जागरूक राहा 

वाट दिसू देगा, देवा वाट दिसू दे, 
गाठ सुटू देगा, देवा गाठ सुटू दे,  


एक चुकलेला निर्णय
Ms. Aditi Lade
 12th Science.

Life with COVID-19 Fear
Ms. Kartiki Shende 
12th Commerce





No comments:

Post a Comment

Our RFSLMM Library

Reliance Foundation School, Lodhivali (MM)   Every Educational Institute is now going ONLINE .   This is our first blog which we are publish...